सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 18 ऑगस्ट : औरंगाबाद (aurangabad) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत चालली आहे. अशातच भर रस्त्यावर तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीव (murder) घेण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर लघुशंका केल्याची विकृत घटना समोर आली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 8 ऑगस्टच्या रात्री शहरातील हनुमान नगरात ही घटना घडली होती. टोळी युद्धातून चार ते पाच जणांनी 22 वर्षीय आकाश राजपूत (akash rajput murder case) या तरुणाला रस्त्यात अडवून रॉड, दांडा, तलवारीने मारहाण केली.
कुटुंबाला भर रस्त्यात पळवून पळवून मारलं, दिवसाढवळ्या गुंडांचा हैदोस
लाकडी दांडा आणि धारदार शस्त्राने मारहाण करून हत्या केली होती. ज्यावेळी ही हत्या करण्यात आली त्या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मारेकऱ्यांनी आकाशला रस्त्यावर खाली पडून बेदम मारहाण केली. शिवाय वेदनेने तडफडणाऱ्या आकाशवर मारेकऱ्यांनी लघुशंका केली. विकृत मानसिकतेच्या मारेकऱ्यांचा हादरवून टाकणारा हा व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेले तरुण सराईत गुन्हेगार आहे. त्यांचे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टोळीशी भांडण झाले होते. आरोपीचे ज्या टोळीशी भांडण झाले होते. त्यांच्यासोबत आकाशची उठबस होती. रविवारी रात्री आकाश हनुमाननगर (ha) येथून आरोपीच्या घराजवळून जात असल्याचे दिसताच आरोपीनी अजयला अडवले आणि तलवार, लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.
बेदम मारहाणीत आकाश जबर जखमी होऊन अर्धमेला झाला होता, रक्ताने माखलेला आकाश वेदनेनं विव्हळत होता. पण, तरीही त्याची दया या गुन्हेगारांना आली नाही. त्यातील एका विकृताने आकाशवर लघुशंका केली. त्यानंतर आकाश तिथेच जमिनीवर पडून होता. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी लगेच धाव घेऊन आकाशचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या हत्येप्रकरणी पुंडलीकनगर (pundlik nagar police station) पोलिसांनी 5 ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, ज्या क्रूरपद्धतीने आरोपींनी तरुणाची हत्या केली आणि त्याचा व्हिडीओ बनविला त्यामुळे मोठी दहशत शहरात पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
