बीड, 18 ऑगस्ट : पैशाचे आमिष दाखवून अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार (Minor girl assault) केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील (Beed Tehsil) नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक (Accused arrest by Police) केली आहे. विक्रम भगवान पवार अस आरोपीचं नाव असून आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला मक्याच्या शेतात नेऊन अत्याचार केला. या घटनेने खळबळ उडाली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलीस स्टेशनच्या परिसरात महिला सामाजिक कार्यकर्त्यानी आरोपीला चपलेने मारहाणीचा प्रयत्न केला. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 11 वर्षीय चिमुकलीला खाऊसाठी पैशाचे अमिष दाखवून गावातील 25 वर्षीय आरोपीने तिला मकाच्या शेतात नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. शेजारच्या लोकांनी पाहिल्यानंतर पीडित मुलीची सुटका केली, तसेच आरोपीला चोप दिला. यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली केले.

नाशिक शिकाऊ डॉक्टर आत्महत्या प्रकरण, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
या सर्व प्रकरणी नेकनूर पोलिसांत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध  376 (अ) (ब), अट्रोसिटी, पॉस्को ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयाय हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांनी दिली. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून मागच्या एक महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये बलात्कार व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपी विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link